आदमपुर जि.प. शाळेत मिशन आपुलकी अंतर्गत राम हालबुर्गे यांच्या कडून शालेय साहित्याचे वाटप.

आदमपुर जि.प. शाळेत मिशन आपुलकी अंतर्गत राम हालबुर्गे यांच्या कडून शालेय साहित्याचे वाटप. 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील मौजे आदमपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी राम गौवर्धन हालबुर्गे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक १२ रोजी शालेय साहित्य वाटप करीत चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. राम हालबुर्गे हे गेल्या अनेक वर्षापासून आदमपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या स्वभावात गोडवा आणि समाजशिल प्रवृत्ती असल्याने ते सर्व गावकऱ्यासोबत मिळून मिसळून राहतात.त्यांनी दिनांक १२ सप्टेंबर रोजी आपला ३६ वा .वाढदिवस ते साध्यापणाने साजरा करत वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शिक्षण विभागाने सुरू केलेल्या "मिशन आपुलकी" या उपक्रमात सहभाग घेत समाजासमोर नवा आदर्श ठेवलेला आहे.
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी आंदमपुर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू डोंपे, मुख्याध्यापक शेषेराव पांचाळ, सहशिक्षक राहूल भद्रे, विठ्ठल अंगरोड, सहशिक्षिका सौ .कल्पना जाधव, सौ.अर्चना जळपतवार,सौ .स्वाती अडबलवार , माजी सरपंच प्रतिनिधी साईनाथ चिंतले, पत्रकार संजय हालबुर्गे , काशिनाथ वाघमारे, अरविंद वाघमारे, नितीश हालबुर्गे, महेश भुरे, उद्धव इंगळे, काश डोम्पे , प्रशांत कांबळे, अमोल सावळे, रवी भुरे, सतीश भुरे, संदीप वाघमारे यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
Previous Post Next Post