श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन श्री .हर्षदा तनपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले..

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन श्री .हर्षदा तनपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले..


(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


अहिल्यानगर जिल्ह्यामधील असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
आज सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी दहा वाजता श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री .हर्ष दादा अरुण तनपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव कपाळे हे होते तर व्यासपीठावर कारखान्याचे संचालक भारतराव वाळुंज संचालक अरुण ढुस संचालक कृष्णा मुसमाडे अण्णासाहेब चोथे आबासाहेब वाळुंज क्रीडा तालुका अध्यक्ष नितीन राव घोलप सर तालुका कार्याध्यक्ष गणेश म्हसे आदींसह मान्यवर उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळण्याची अत्यंत आवश्यकता असून मैदानी खेळणे आपले शरीर चपळ वळणदार व मजबूत बनण्यास मदत होते मैदानी खेळ हा स्पर्धेच्या काळापुरताच मर्यादित न ठेवता मैदानी खेळ सर्व तरुण विद्यार्थ्यांनी दररोज करावा असे आव्हान श्री .हर्ष दादा तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना केले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .शिवाजीराव कपाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सदर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये राहुरी तालुक्यातील विद्यालयांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला असून सदर स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे .
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राहुरी तालुक्याचे क्रीडा अध्यक्ष नितीन राव घोलप सर विद्यालयाचे प्राचार्य बी . एल .शिरसाट सर पर्यवेक्षक चव्हाण सर क्रीडा शिक्षक पाटील सर कलाध्यापक विशाल तागड सर धावडे सर नाईक सर लहारे सर लांडगे सर सौ .कवाने मॅडम आदींसह शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत
Previous Post Next Post