देवळाली प्रवरा येथील वाळुंज वस्ती येथे बिबट्याचा कालवडीवर हल्ला - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

देवळाली प्रवरा येथील वाळुंज वस्ती येथे बिबट्याचा कालवडीवर हल्ला - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..


(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील वाळुंज वस्ती येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने दोन कालवडीवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे या हल्ल्यात एका कालवडीचा मृत्यू झाला असून दुसरी कालवड बिबट्याच्या तावडीतून बचावली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रमेश सकाहरी वाळूंज व अनिता रमेश वाळुंज या दापत्याकडे दोन कालवडी होत्या दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान वाळुंज यांच्या घराबाहेर असलेल्या कालवडींचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने वाळुंज दापत्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यावेळी एका कालवडीवर बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी दुसरी कालवड बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठीकालवडीने खुंटीला जोरदार हिसका देत तिथून पळ काढला त्यामुळे तिचा जीव वाचला मात्र दुसऱ्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर नानासाहेब मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली .
या घटनेमुळे वाळुंज वस्ती परिसरासह देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नुकसान ग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यकते सहाय्य करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .
Previous Post Next Post