परळीतले गुंड मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे, त्यांच्यापुढं मुख्यमंत्र्याचाही विलाज नाही - ज्ञाणेश्वरी मुंडे.
(आंतरवाली: /प्रशांत बाफना विभागीय संपादक)
परळीतले गुंड मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे आहेत. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या पुढे काही विलाज नाही असं आम्हाला कळलंय, त्यामुळे अद्यापर्यंत आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचं ज्ञाणेश्वरी मुंडे यावेळी म्हणाल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज रविवारी (दि.6) नववा दिवस. प्रकृती खालवल्याने आंतरवालीत गर्दी वाढत आहे. स्व. महादेव मुंडे यांच्या पत्नी दोन मुलांसह आई-वडिल या परिवारासह त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेवून त्यांनी प्रकृतीची विचापूस केली. जरांगे पाटील हे संघर्ष योद्ध तर आहेत पण ते आमच्यासारख्या गरिबांना न्याय देण्यात पुढाकार घेतात म्हणून मी त्यांना समाजसुधारक असं संबोधल्याचं ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या. ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना राखी बांधल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
स्व. महादेव मुंडे यांच्या न्याय लढ्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, दादांची भेट घेतल्यानंतर एसआयटी स्थापन झाली. एसआयटी स्थापन होवून एक वर्षे होवून देखील अद्याप आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. नार्कोटेस्टमध्ये पंकज कुमावत यांनी पत्र देवून हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे सांगितलं होतं. पण आद्याप आरोपी निष्पन्न झाले नाहीत.
काही अमिषं दाखवण्यात येत आहे का? यावर त्या म्हणाल्याएसआयटी स्थापन झाली त्याचवेळेस पैशाचे अमिष दाखवण्यात आले होते मात्र मी तो झुडकारुन लावला. मात्र आम्ही न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत न्यायाचा लढा चालूच राहिल. तुम्हाला धमकावण्यात येत आहे का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की आता आम्हाला धमकावून त्यांना काय मिळणार आहे. त्यांना ज्यांना मारायचं होतं त्यांना त्यांनी मारलं आता आमच्याकडून काय मिळणार त्यांना.
बीडमधील मोर्चात महादेव मुंडे यांचे बॅनर हटवण्यावरून ज्ञाणेश्वरी मुुंडे म्हणाल्या की, आम्हाला त्या मोर्चात बोलावलं नव्हतं. या उलट त्यामध्ये असं सांगण्यात आलं की वाल्मिक कराड हा साहेब आहे. जो वाल्मिक कराडला साहेब म्हटला त्यांचाही या गुन्ह्यात समावेश असेल. त्यांना काही यामध्ये लालच देवूनच यामध्ये शब्द वापरले असतील. ज्यांनी त्यात पुढाकार घेतला ते सगळे राख माफिया, वाळू माफिया वा लालचखोर असेच लोकं होते.
न्यायाच्या अपेक्षेने मी कोणत्याच स्थानिक नेत्याला भेटले नाही, त्यांना जर मला न्याय द्यायचा असता तर त्याच वेळेस मला त्यांनी न्याय दिला असता. मात्र, त्यांचीच माणसं या गुन्ह्यात असल्यामुळे मला त्यांच्याकडून न्याय मिळू शकत नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यात गाडी घालून आम्हाला त्यांची भेट घ्यावी लागली. त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि म्हणाल्या तुमच्या सर्व नोट्स घेवून पण अद्यापर्यंत त्यावर काहीच झालं नाही.
पुढे बोलताना ज्ञाणेश्वरी मुंडे म्हणाल्या येत्या 21 ऑक्टोबरला तीन वर्षे होत आहेत माझा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. भास्कर केंद्रे आणि सानप या पोलिस अधिकार्यांनी आमची दिशाभूल करून दोन वर्षे टाळाटाळ केली. ज्यावेळी मी सत्त्यतेपर्यंत पोहोचले त्यावेळेस मला दादांनी (जरांगे पाटील) यांनी खूप मदत केली पण परळीतल्या गुंडांपुढे विलाज नाही असं मला वाटायला लागलंय आता. ते पोलिस अधिकारी अद्यापही कार्यरत आहेत त्यांच्या केवळ बदल्या केल्या, मी मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं होतं की त्यांना निलंबीत करा त्यांनी आमची दिशाभूल केली.
एकतर आम्हाला न्याय नाही. एसआयटी स्थापन होवून एक वर्ष पूर्ण झालं आहे तरीही अद्याप आरोपी निष्पन्नच झाले नाहीत असं सांगण्यात येतंय मग काय मुख्यमंत्री साहेबांकडून आशा करावी असं वाटतंय. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊन न्याय नाही म्हटल्यावर आता मी कोणती भूमिका घेऊ ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

