यावलला केंद्रीय मंत्र्याचा कार्यक्रम गुपचूप.? महायुतीमध्ये प्रसिद्धी प्रमुख नाही का.?
आमदार जावळे अनुपस्थितीची चर्चा.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.४
शहरात राष्ट्रीय महामार्गच्या रस्ते कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री खडसे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.यात भाजपच्या मोजक्याच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम गुपचूप उरकवला विशेष म्हणजे या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी माध्यमांना न दिल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रसिद्धी प्रमुख आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तसेच महायुतीमध्ये दुफडी दिसून आल्याची चर्चा सुद्धा संपूर्ण यावल शहरात आहे तसेच या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्धी प्रमुखांनी न दिल्याने पत्रकारांनाही या कार्यक्रमापासून सोयस्कर रित्या लांब ठेवण्याचं काम करण्यात आले.
हा कार्यक्रम सार्वजनिक असला तरी तो केवळ भारतीय जनता पार्टीचा असल्याचा दिसून आला यात आमदार जावळेंच्या अनुपस्थितीबद्दल देखील शहरातील राजकारणात चर्चा आहे.शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ १५ कोटीच्या निधीतून केंद्रीय बालकल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते शुक्रवारी बऱ्हाणपूर – तळोदा या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन झाले.गुजरात आणि मध्य प्रदेशात दोन राज्याला जोडणाऱ्या हा रस्ता आहे.हा कार्यक्रम केव्हा झाला आहे केवळ सोशल नेटवर्क फोटो व्हायरल झाल्यानंतरच लक्षात आले.तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील अनेक पदाधिकाऱ्यांना हेतू पुरस्कार डावलले तर आमदार अमोल जावळे यांनी देखील या कार्यक्रमात अनुपस्थित दर्शवली. त्यामुळे देखील शहरात चर्चा रंगली होती.एकूणच हा कार्यक्रम सार्वजनिक असला तरी या कार्यक्रमापासून महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना बोलवण्यातचं आले नव्हते तर पत्रकारांना देखील सोयस्करित्या लांब ठेवण्यात आले होते. एकुणचं सार्वजनिक कार्यक्रम असला तरी हा कार्यक्रम भाजपाचा आहे असे दिसुन आले.व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम उरकवून घेतला.
हेतू पुरस्कार डावलण्याचा प्रकार.सदर कार्यक्रमाचे आमंत्रण आले नव्हते असे शिंदे सेनेचे पदाधिकारी तथा बाजार समितीचे संचालक बबलु कोळी यांनी सांगीतले,तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ऍड.देवकांत पाटील यांनी ऐन वेळी आमच्या पक्षातील एका पदाधिकारीने कार्यक्रमातुन कॉल करून कार्यक्रमात या असे सांगीतले तेव्हा ऐन वेळी कसं जाणार असे सांगीतले.एकुणचं कार्यक्रमात स्थानिक आमदार अमोल जावळे देखील उपस्थित नसल्याने देखील चर्चा रंगली होती.
पत्रकारांमधून नाराजी.
भाजपाच्या वतीने केवळ निवडणुक काळी पत्रकारांना कार्यक्रमात बोलवले जाते व त्यानंतर शहरात आजवर अनेक कार्यक्रम भाजपाचे झाले मात्र, कुठेही पत्रकारांना बोलावलं जात नाही,यातुन जणु भाजपाला त्यांच्या विकास कामांच्या प्रसिद्धीसाठी पत्रकारांची गरजचं नाही असे स्थानिक पत्रकारांनी बैठक घेवुन नाराजी व्यक्त केली.तर हा कार्यक्रम भाजपाचा होता का सार्वजिक होता असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
यावल भाजपच्या विकासकामांची प्रसिद्धी कुठे?
प्रसिद्धी प्रमुख नसल्याने माध्यमे अनभिज्ञ .?
केवळ व्हॉट्सॲप-
फेसबुकवर माहिती देण्याची पद्धत.
यावल शहरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पक्षाचा शहर पातळीवर स्वतंत्र प्रसिद्धी प्रमुख नसल्याने अनेक विकासकामांची माहिती केवळ काही कार्यकर्ते व पदाधिकारी व्हॉट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित करीत असल्याची चर्चा आहे.
मात्र अनेक नागरिक आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असल्याने सोशल मीडिया पाहू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाने प्रसिद्धी यंत्रणा सक्षम करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही विकासकामांची अधिकृत माहिती वेळेवर मिळावी, अशी मागणी होत आहे.

