*भद्रावतीत शिवसेना शिंदे गटाचा गोकुळाष्टमी उत्सव जल्लोषात; भव्य दहीहंडीने उत्सवाचा समारोप* राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अभिनेते क्षितिज दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला सोहळा; रुग्णवाहिकेचे लोकार्पण, विविध स्पर्धांनी उत्सवाला सामाजिक-सांस्कृतिक व्यायाम..

*भद्रावतीत शिवसेना शिंदे गटाचा गोकुळाष्टमी उत्सव जल्लोषात; भव्य दहीहंडीने उत्सवाचा समारोप* 

राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अभिनेते क्षितिज दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला सोहळा; रुग्णवाहिकेचे लोकार्पण, विविध स्पर्धांनी उत्सवाला सामाजिक-सांस्कृतिक व्यायाम..

महेश निमसटकर 
भद्रावती चंद्रपुर जिल्हा विभागीय संपादक 




भद्रावती, दि.०७: भद्रावती शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, हनुमान नगर, नेताजी कॉलनी येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाचा आज भव्य दहीहंडी सोहळ्याने उत्साहात समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात दहीहंडी, रांगोळी स्पर्धा, कृष्ण-राधा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज रविवार, ६ सप्टेंबर रोजी झालेल्या समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ‘धर्मवीर’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे सिनेअभिनेते क्षितिज दाते यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

दहीहंडीच्या थरांनी वाढविला उत्साह

गोकुळाष्टमीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी सोहळ्यात गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. ढोल-ताशांचा गजर, जय श्रीकृष्णाच्या घोषणा आणि उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
रांगोळी, कृष्ण-राधा स्पर्धांनीही वेधले लक्ष
उत्सवाच्या पूर्वसंध्येला ५ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा तसेच कृष्ण-राधा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसह बालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध रंगांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी कार्यक्रमस्थळाची शोभा वाढली.
या दिवशी ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीने सहभागी आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, तसेच आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती रेखाताई खुटमाटे, महिला व बालकल्याण सभापती शोभाताई पारखी, नियोजन समितीचे सभापती राहुल सोनटक्के, नगरसेवक महेश जिवतोडे, संदीप वडाळकर, योगेश गाडगे, संतोष कुरेकर, देवेंद्र गडपाले, राजेश बदकल आदींसह नगरसेवक-नगरसेविका आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात लोकसभा संघटक मुकेश मनोज जिवतोडे (चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र) यांची प्रमुख भूमिका होती.
भव्य आयोजनाने गोकुळाष्टमी उत्सवाची सांगता
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित या गोकुळाष्टमी उत्सवातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहीहंडीच्या निमित्ताने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर रुग्णवाहिका लोकार्पणामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेशही देण्यात आला.
भव्य दहीहंडी, मान्यवरांची उपस्थिती आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे भद्रावतीतील गोकुळाष्टमी उत्सवाची दिमाखदार सांगता झाली.
Previous Post Next Post