शहादा येथे विद्याश्रम परिवारात ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान संस्थास्तरीय कला महोत्सवाचे आयोजन..

शहादा येथे विद्याश्रम परिवारात ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान संस्थास्तरीय कला महोत्सवाचे आयोजन..

 (नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )

शहादा : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ अर्थात विद्याश्रम परिवाराच्या विविध विद्याशाखांचे संस्थास्तरीय तीन दिवशीय कला महोत्सवाचे आयोजन दि.७ ते ९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. 
     या कला महोत्सवात मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी, शिक्षण शास्त्र आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.सर्व स्पर्धा मंडळाच्या महात्मा गांधी सभागृह, सर विश्वेश्वरय्या सभागृह तसेच सरदार पटेल हॉल येथे पार पडणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दि.७ सप्टेंबर रोजी होणार असून, समारोप व पारितोषिक वितरण सोहळा दि.९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चित्रकला, रांगोळी, मातीकाम, मेहंदी, वक्तृत्व स्पर्धा, सुगम गायन, लोकगीत, मूकनाट्य, प्रहसन, नाट्य, लोकनृत्य आणि कर्मचाऱ्यांसाठी गायन स्पर्धा अशा विविध कलाप्रकारांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धा दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत रंगणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच कला, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कला महोत्सवाच्या यशस्वी संयोजनासाठी कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.के.पटेल,प्रा. डॉ. चंद्रशेखर सुतार व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
Previous Post Next Post