मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; धर्माबाद कडकडीत बंदमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धर्माबाद येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; धर्माबाद कडकडीत बंद..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धर्माबाद येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


(धर्माबाद नांदेड तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद

केली. सध्या संपूर्ण मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर धर्माबादमधील आजचा बंद पूर्णपणे यशस्वी आणि अत्यंत शांततेत पार पडला. शहरातील मुख्य बाजारपेठा आणि

व्यावसायिक दुकाने बंद राहिल्याने या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचे दिसून आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous Post Next Post