यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात २४ तासात तिघांची आत्महत्या,
दोघांनी घेतला गळफास,एकाची विहिरीत उडी मारून केली आत्महत्या.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रा तिघांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील रहिवासी व सांगवी खुर्द येथील रहिवाशी अशा दोघा तरुणांनी गळफास घेतला तर दहिगाव येथील एकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
या तिघा प्रकरणात यावल पोलीस स्टेशनमधे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शहरातील चोपडा रस्त्यावर इंदिरा गांधी हायस्कूलच्या शेजारील डांगपुरा भागात शेख मुजाहिद शेख मुन्शी मोमीन वय ३९ या तरुणाने गळफास घेतला. हा प्रकार रविवारी रात्री निदर्शनास आला त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय नेले असता त्या ठीकाणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तर दुसऱ्या एका आत्महत्याच्या घटनेत सांगवी खुर्द तालुका यावल या गावातील रहिवासी प्रमोद श्रावण गोसावी वय ४१ याने देखील आपल्या पायाच्या आजाराला कंटाळून वायरच्या साह्याने गळफास घेतला त्यालाही यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तसेच दहिगाव तालुका यावल येथील रहिवाशी नरेंद्र उर्फ ज्ञानबा यादव पाटील वय ३६ याला दारूचे व्यसन होते. त्याचे व्यसन सोडवून आणले होते व अचानक दारू बंद झाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते व तो घरातून बेपत्ता झाला होता तेव्हा त्याचा मृतदेह सोमवारी दुपारी शेतातील विहिरीत
मिळून आला. या तिघांच्या आत्महत्या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनांचा तपास
पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी,पोलिस हवलदार उमेश महाजन,पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

