बिलोलीत शुक्रवारी भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन; नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने बिलोली येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्यांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बिलोली येथील पंचायत समिती हॉलमध्ये ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडेल. या शिबिरात परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह व इतर आजारांची तपासणी केली जाईल. तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्यात येणार आहेत.या महाआरोग्य शिबिराला राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशिर माजिद हे विशेष उपस्थित राहणार आहेत. बिलोली परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, माता-भगिनींनी व युवकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन व आयोजक सय्यद रियाज, शेख वाजिद, यांच्या सह मुफ्ती सय्यद युनुस, मौलाना मुबिन खान, मुफ्ती सय्यद जुबेर, हाफीज मोहम्मद साहब, बासीद खान, मोईन सेठ, फैजोद्दीन कुरेशी, अब्दुल रशीद,शेख फारुख,रफिक इनामदार, मुशीर काझी, शेख पाशा भाई गादिवाले, शेख जावेद, शेख नवाब, सय्यद फिरदोस, शेख सैलानी यांच्यासह जमियत उलेमा-ए-हिंद, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद आणि सकल मुस्लिम समाज, बिलोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

