डेंग्युमुक्त अहिल्यानगर अभियान । 270 पाणीसाठ्यांत डेंग्यूच्या अळ्या । 28 हजार पाणीसाठ्यांची तपासणी । नऊ हजार घरांची झाडाझडती.

डेंग्युमुक्त अहिल्यानगर अभियान । 270 पाणीसाठ्यांत डेंग्यूच्या अळ्या । 28 हजार पाणीसाठ्यांची तपासणी । नऊ हजार घरांची झाडाझडती.

(अहिल्यानगर । प्रशांत बाफना विभागीय संपादक)


अहिल्यानगर शहरात डेंग्यूचा डंख रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ॲक्शन मोड घेतला आहे. महापालिकेच्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या माध्यमातून 9 हजार घरांची तपासणी करुन 28 हजार पाणी साठ्यांची तपासणी केली आहे. त्यामुध्ये 270 पाणी साठ्यांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. अळ्या आढळून आलेल्या ठिकाणी मनपाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या दहाव्या आठवड्यानिमित्त गांधीनगर परिसरात नागरिकांमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती तसेच पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी कै. बाळासाहेब केशव ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यूविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करून नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधाचा संदेश दिला. तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, कै. बाळासाहेब केशव ठाकरे मनपा शाळेत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिले जात असल्यामुळेच विद्यार्थ्यांनी डेंग्यूमुक्त अभियानांतर्गत पथनाट्य, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर केले. त्यामुळे या शाळेची गुणवत्ता कौतुकास्पद आहे. या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील तसेच कामगार वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असून हीच पिढी उद्याच्या उज्ज्वल भारताचे भविष्य आहे.



स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्य सुविधा प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम डॉक्टर, आरोग्य सेविका आणि आशा सेविका करत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढते. हे आजार आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे.नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची खबरदारी घ्यावी. आठवड्यातून एकदा घरातील तसेच परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करून ते स्वच्छ ठेवावेत आणि एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान कै. बाळासाहेब केशव ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यू प्रतिबंधाविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तसेच निबंध, वक्तृत्व आणि इतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यानंतर मनपा अधिकारी व आरोग्य पथकाने नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली. सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पाणीसाठ्याची तपासणी केली असता डेंग्यूसदृश्य अळ्या आढळून आल्या. संबंधित पाणीसाठे नष्ट करण्यात आले तसेच परिसरात धूर फवारणी करण्यात आली.या कार्यक्रमावेळी आयुक्त यशवंत डांगे, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेविका आशाताई कातोरे, सामाजिक कार्यकर्ते किसन भिंगारदिवे, उद्योजक केशव नागरगोजे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, नियंत्रण अधिकारी डॉ. सृष्टी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा चेलवा, डॉ. प्रवीण डुंगुरवाल, शाळेचे मुख्याध्यापक ए. एल. सातपुते यांच्यासह पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सृष्टी बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रीती जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शिल्पा चेलवा यांनी मानले.


शहरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले
शहरात डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा दहावा आठवडा सुरू असून आतापर्यंत आशा व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून 9 हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. 28 हजार पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 270 पाणीसाठे दूषित आढळले. या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने संबंधित पाणीसाठ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या. धूर व औषध फवारणी करून पाण्यात अबेट औषध टाकण्यात आले. परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले. आतापर्यंत शहरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले आहेत, शहरातील डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले
Previous Post Next Post