राहुरीत भगर खाल्ल्याने १० ते१५ जणांना विषबाधा
मळमळ उलट्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू एकाला नगरला हलविले.
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
नवरात्र उत्सवानिमित्त उपवासासाठी भगर खाल्ल्यानंतर राहुरी शहर व परिसरातील सुमारे १० ते१५ जणांना विषबाधे सदृष्य त्रास सुरू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे मळमळ व उलट्यांचा त्रास जाणू लागल्याने संबंधित रुग्णांना राहुरी शहरातील तसेच राहुरी फॅक्टरी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने अनेक महिला व पुरुष नऊ दिवसाचे उपवास करतात उपवासाच्या काळात भगर हा प्रमुख खाद्यपदार्थ म्हणून उपवासासाठी वापरला जातो मात्र राहुरी परिसरात भगर खाल्ल्यानंतर अनेकांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
राहुरी शहर येवले आखाडा राहुरी स्टेशन तसेच वाघाचा आखाडा येथील सुमारे १० ते१५जणांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे त्रास जाणू लागल्यानंतर संबंधितांनी उपचारासाठी रुग्णालयाकडे धाव घेतली काही रुग्णांवर राहुरी शहरात तर काहींवर राहुरी फॅक्टरी परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकृतीच्या कारणास्तव तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे .
येवले आखाडा येथील प्रा .बाळासाहेब जगन्नाथ जाधव यांच्या मातोश्री सुमनबाई जगन्नाथ जाधव यांच्यासह अनेक जण राहुरीत व राहुरी फॅक्टरी येथे उपचार घेत असून वाघाचा आखाडा येथील सुरेश पठारे यांनाही पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे
नवरात्र उत्सवात उपवासासाठी भगर शेंगदाणे बटाटे आधी पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते अशावेळी अन्नपदार्थांची गुणवत्ता साठवणूक आणि वापराची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे असते राहुरी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या भगरीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे प्राथमिक चर्चेत निकृष्ट दर्जाच्या भगरीमुळे त्रास झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून तरी विषबाधेचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही दरम्यान संबंधित भगरीचा नमुना तपासण्यात आला आहे का ? तसेच या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे का याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही .
विषबाधेचे नेमके कारण शोधून संबंधित अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे या घटनेमुळे उपवासासाठी भगरीचा वापर करणाऱ्या नागरिकांनी भगर खरेदी करताना उत्पादनाची गुणवंत पॅकिंग मुदत आणि साठवणूक निकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे
नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार व नागरिकांकडून विचारणा केली जात आहे संबंधित यंत्रणांनी घटनेची त्वरित दखल घेऊन भगरीच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे .

