अंजनी येथे शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या ढिगाला आग; तीन एकरांचे पीक जळून खाक..
दुष्काळात शेतकऱ्यावर आर्थिक संकट ..
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :अंजनी, ता. बिलोली येथील शेतकरी गंगाधर सायबु मजगे यांच्या शेतातील सुमारे तीन एकर सोयाबीनच्या पिकाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले.
ही घटना बुधवारी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेमुळे शेतकरी गंगाधर मजगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत बिलोली तहसील कार्यालयास कळविण्यात आले, त्यावर तलाठी मुखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. सदर शेतकऱ्यास तातडीची मदत देण्यात यावी अशी ग्रामस्थांनी तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कडे केली आहे.
महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

