राहुरीच्या कंत्राटदाराने सफाई कामगारांना कामावरून हाकलले..
संबंधितावर गुन्हा दाखल करावा तानसेन बिवाल यांची मागणी.
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
राहुरी नगर परिषदेतील टेंडर सफाई कामगारांचा न्यायालयीन वाद प्रलंबित असतानाच कंत्राटदाराने सफाई कामगारांना कामावरून हटविल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने केला आहे घंटा गाड्यांच्या चाव्या बळजबरीने हिसकावून घेतल्यातसेच बाहेरील व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला आहे या प्रकरणी कामगारांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि कामगारांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी केली आहे .
राहुरी नगरपरिषदेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या टेंडर सफाई कामगारांच्या विविध मागण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे किमान वेतन कायद्यानुसार योग्य वेतन व थकीत भविष्य निर्वाह निधी आणि इतर मागण्यांसाठी हा लढा सुरू असल्याचे संघटनेने सांगितले .
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कंत्राटदाराला नोटीस बजावल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे तसेच कामगारचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना कामगारांना कामावरून हटविण्याची कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे दरम्यान 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी कंत्राटदाराने कामगारांना कामावरून काढले असल्याचे सांगितले कामगारांनी याला विरोध केल्यानंतर कामगारांना धक्क्याबुक्क्या करून घंटागाड्यांच्या चाव्या हिसकावून घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे यावेळी काही बाहेरील व्यक्तींनी कामगारांना धम्मकविल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे .
या घटनेनंतर सर्व संबंधित कामगारांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केला कंत्राट दारावर व तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या धमकी देणाऱ्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून कामगारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन दिवाल यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .रवींद्र देशमुख साहेब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .

