राहुरी नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र दालन..

राहुरी नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र दालन..

(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )

राहुरी नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच महिला व बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे सण १९७२ मध्ये स्थापन झालेल्या राहुरी नगर परिषदेच्या महिलांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हा उपक्रम मानला जात आहे या स्वतंत्र दालनामुळे शहरातील महिलांना वैयक्तिक समस्या अडचणी आणि आपल्या व्यथा मनमोकळेपणाने मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाली आहे .
राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉ .उषाताई तनपुरे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले महिला नगरसेविकांकडून सातत्याने करत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडे यांनी महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार यावेळी केला आहे .
सदर उद्घाटन प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे उपनगराध्यक्ष हर्ष तनपुरे मुख्याधिकारी विद्या पाटील याचबरोबर नगरपरिषदेचे नगरसेवक नगरसेविका अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे महिला वर्गात स्वागत होत आहे मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांची कितपत सोडू नको होते हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .
Previous Post Next Post