*पाचोऱ्यात अँग्लो उर्दू हायस्कूलची कबड्डीत बाजी!**१४ वर्षांखालील मुलांच्या संघाचा तालुकास्तरावर दणदणीत विजय; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा!*

*पाचोऱ्यात अँग्लो उर्दू हायस्कूलची कबड्डीत बाजी!*

*१४ वर्षांखालील मुलांच्या संघाचा तालुकास्तरावर दणदणीत विजय; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा!*

पाचोरा : माध्यमिक विद्यालय घुसर्डी ता. पाचोरा येथे कबड्डीच्या तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. यात अँग्लो उर्दू हायस्कूल, पाचोरा येथील १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. या शानदार यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ, सांघिक भावना, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक मिळविला. या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. अजहर खान सर यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सराव व परिश्रम मोलाचे ठरले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
अँग्लो उर्दू हायस्कूलच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
🏆 विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन! 🥇
Previous Post Next Post