सिरजखोड येथे शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी



सिरजखोड येथे शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी

तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष 

धर्माबाद तालुक्यातील मौजे, सिरजखोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची ३९१ वी जयंती च्या अध्यक्षस्थानी माजी. सरपंच मिर्झा गफार बेग, व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजलन व प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्या भाषणातून काही मोजक्या शब्दात शिवरत्न वीर जिवाजी महाले हे शिवरायांच्या मावळ्यापैकी एक निष्ठावंत मावळे होते, स्वतःच्या प्राणाची

पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांवर होणारा वार आपल्या अंगावर घेऊन सय्यद बंडा नावाच्या शत्रूपासून शिवरायाचें रक्षण केले, तेव्हापासून होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण रूढ झाली. असे आपल्या सरळ सोप्या भाषेत इतिहास नामदेव सज्जन यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील माजी. सरपंच प्रतिनिधी हिलालअली, तंटामुक्ती अध्यक्ष मिर्झा अपसरबेग, पोलीस पाटील शामराव पवार,

दत्ताहरी पवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपल्या मनोगतातून वनरक्षक वनअधिकारी मा. सज्जन श्रीराम यांनी अतिशय छान प्रकारे पार पाडले. सदरील जयंती यशस्वी करण्यासाठी जिवाजी महाले उत्सव समितीचे अध्यक्ष तानाजी सज्जन उपाध्यक्ष कृष्णा सज्जन, सदस्य माधव सज्जन व कार्तिक सज्जन यांनी खूप परिश्रम घेतले आहे.

तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
Previous Post Next Post