शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन.
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील शिर्डी येथे होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात 30 सप्टेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
या महामोर्चा संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राहुरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायी यांनी रविवारी सायंकाळी सात वाजता राहुरी येथील (राजवाडा समाज मंदिर ) येथे उपस्थितीत राहावे सदर शिर्डी येथे होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे ) जिल्हाध्यक्ष श्री .सुरेंद्र भाऊ थोरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा नेते पप्पू भाऊ बनसोडे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे ) जिल्ह्यातील नेते उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार असून सदर बैठकीस राहुरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायी यांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गटाचे ) राहुरी तालुका अध्यक्ष श्री .विलास नाना साळवे व तालुका उपाध्यक्ष श्री .सुनील चांदणे त्याचबरोबर राहुरी तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे .

