कार्ला( बु) शिवशक्ती दुर्गा माता मंडळ तर्फे आयोजित खुले व्हॉलीबॉल सामने उत्साहात संपन्न.

कार्ला( बु) शिवशक्ती दुर्गा माता मंडळ तर्फे आयोजित खुले व्हॉलीबॉल सामने उत्साहात संपन्न.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड: बिलोली तालुक्यातील कार्ला (बु )येथे दिनांक 17 ऑक्टोबर 2026 वार शनिवार रोजी शिवशक्ती दुर्गा माता मंडळ तर्फे खुले हॉलीबॉल सामने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला बु येथे आयोजित करण्यात आले होते, सदरील कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री लोखंडे साहेब, व तिडके साहेब, अंभोरे साहेब त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब व शिवा संघटनेचे मावळे, त्याचबरोबर नगरसेवक संदीप जी कटारे, यांची उपस्थिती लाभली यांच्यातर्फे रिबीन कट करून,सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनापूर्वी उपस्थित,मान्यवरांचे सत्कार करण्यात आले विशेष बाब म्हणजे फक्त गावाच्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांचा हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,गावकऱ्यांच्या मोठ्यापणा आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मनाच्या मोठ्यापणामुळे कोणीही गावकऱ्यांच्या सत्कार करायचा नाही, असे ठरवले त्यानंतर सामन्यांची सुरुवात झाली अतिशय रंगतदार पद्धतीने, विविध खेळाडू तर्फे आपापल्या संघासाठी प्रदर्शन करण्यात आले, एकूण 14 संघ या टूर्नामेंट मध्ये सहभागी झाले होते. शहापूर येथील 3 संघ, खतगाव येथील 2 संघ, लांब असलेल्या मुक्रामबाद येथील 1 संघ, मरवाळी तांडा येथील 1 संघ,कासराळी येथील 1 संघ,कोटगाळ येथील 1 संघ,गंजगाव येथील 2 संघ,कार्ला बु येथील 2 संघ, सगरोळी येथील 1 संघ, सहभागी झाला होता सदरील सामन्यांच्या दरम्यान सर्व गावातील व्हॉलीबॉल प्रेमी उपस्थित होते. सर्वांतर्फे आलेल्या खेळाडूंची उत्तम पद्धतीने व्यवस्था करण्यात आली,आणि त्यांच्या खेळाला टाळ्यांच्या गजराने दात देण्यात आली त्यामुळे बाहेरून आलेल्या संघांच्या प्रतिनिधींनीही आपल्या गावाचे, आणि येथील लोकांचे खूप कौतुक केले टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांकावर सगरोळी स्पायकर्स ही टीम विजयी झाली, आणि विजय संघास श्री रमेश पाटील यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक म्हणून 5100 रुपये, व ट्रॉफी देण्यात आली,टूर्नामेंटच्या शेवटी मुक्रामबाद संघ,अंतिम फेरीमध्ये थोडक्या फरकाने पराभूत झाल्यामुळे, द्वितीय पारितोषिक त्यांना देण्यात आले, हे पारितोषिक बालाजी सायलू वसलो यांच्यातर्फे 3100 रुपये व ट्रॉफी देण्यात आली, आणि जय जवान जय किसान संघ शहापूर, हा विजय झाल्यामुळे त्या संघास श्री मारोती उजलाजी कांबळे यांच्यातर्फे 2100 रुपयाचलचे पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात आली, त्यानंतर बेस्ट शूटर म्हणून मुजीब सर सगरोळी यांना 1100 रुपयांचे पारितोषिक साईनाथ शामराव केंद्रे यांच्यातर्फे देण्यात आले, बेस्ट लिफ्टर म्हणून शहापूरच्या लहान मुलाला 1000पारितोषिक श्री शंकर पोचिराम जेठे यांच्यातर्फे देण्यात आले,
त्याचबरोबर जनरेटरची व्यवस्था श्री विलास पाटील यांच्यातर्फे करण्यात आली 
 जेवणाची व्यवस्था खिचडीच्या स्वरूपामध्ये श्री श्रीकांत अशोकराव कस्तुरे श्री गंगाधर मरीबा रेडेस श्री साईनाथ मारोती परसुरे यांच्यातर्फे करण्यात आली, त साऊंड सिस्टिम ची व्यवस्था श्री नरेश भीम कसेवार मुक्ताई टेन्ट हाऊस कार्ला (बु )यांच्यातर्फे विशेष बाब म्हणजे एकही रुपया न घेता स्वखुशीने आणि उत्तम पद्धतीने करण्यात आली आणि खेळाडूंना खेळ दाखवण्याची, देणगीदारांना देणगी देण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या कार्ला नगरीतील,हॉलीबॉल खेळाडूंचे अभिनंदन गावकऱ्यांकडून करण्यात आले.
Previous Post Next Post