देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वजनात अनियमितता ?
ठेकेदारावर कारवाई करण्याचे काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी..
राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यात असणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मार्फत घनकचरा संकलन आणि वाहतूक होणाऱ्या वाहनांच्या वजनात कथित अनियमिता असल्याचा संशय व्यक्त करत संबंधित ठेकेदाराची चौकशी करून ठेकेदार दोषी आढळल्यास त्याची देयके रोखावीत व दोषींवर कारवाई करावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नगरसेवक व विरोधी पक्ष नेते तुकाराम (दासू ) पठारे नगरसेविका सुनीता थोरात नगरसेवक शरद वाळुंज यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे .
यासंदर्भात त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री .ऋषिकेश पाटील साहेब यांना लेखी निवेदन दिले आहे घनकचरा संकलन आणि वाहतुकीस वापरण्यात येणाऱ्या कचरा गाड्यांच्या वजनाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून काही प्रश्न उपस्थित केले आहे यासंदर्भात चालक व संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता ठेकेदाराने कचरा गाडीचे वजन प्रत्यक्ष वजनापेक्षा जास्त दाखविण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे तसेच वजन काट्यावर गाड्यांचे वजन करताना संबंधित कर्मचारी हा गाडीमध्ये बसून राहत असल्याचे आणि त्यामुळे गाडीतील वजनाची अनियमतता व नोंदीत बदल होऊ शकतो असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निपक्ष चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा येत्या 25 ऑक्टोंबर 2026 रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे यावेळी वैभव ( दादा ) गिरमे अनिल चव्हाण आदींसह देवळाली प्रवरा परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थितीत होते .

