हिप्पारगा थडी येथे डॉ.अण्णा भाऊ साठे वाचनालयात डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती डॉ. अण्णा भाऊ साठे अभ्यासिका,व वाचनालय हिप्पारगा थडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले,यावेळी वाचनालय समिती अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, सहसचिव दीपक मोहन एडकेवार यांच्या, हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार, व फुले वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी,उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम एडकेवार,जकोजी एडकेवार, सुरेश एडकेवार, प्रमोद बेलकर,गजानन एडकेवार, अनिल एडकेवार भूमाजी अंजनीकर,माधव अंजनीकर , व सर्व वाचनातील विद्यार्थी उपस्थित होते,यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे भारतासाठी, खूप मोठा योगदान असून त्यांनी विद्यार्थ्यांना एकच महत्त्वाचे संदेश दिले, आपण कितीही लहान व दुबळे, व आर्थिक परिस्थितीने ही कमजोर असलो तरी स्वप्न मात्र मोठे पाहायचे,आणि तो स्वप्न खर करण्यासाठी अभ्यास करून यश गाठायच त्यामुळे स्वप्न हे मोठे पहा, आणि मोठेबना त्यांचा हा संदेश विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे आपल्या मनोगत व्यक्त केले व वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर यांनी आभार, प्रदर्शन केले मोठ्या उत्साहात जयंती साजरा करण्यात आली.

