दुःखद निधन
भारत आत्राम
भद्रावती : अहिल्यादेवी नगर, भद्रावती येथील रहिवासी तथा राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी भारत तानबाजी आत्राम (वय ६१) यांचे नागपूर, हिंगणा येथील दत्ता मेघे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

