देवळाली नगरपरिषदेने नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली स्थगित करावी - - नगरसेवक तुकाराम (दासू ) पठारे यांचे निवेदन..

देवळाली नगरपरिषदेने नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली स्थगित करावी - - नगरसेवक तुकाराम (दासू ) पठारे यांचे निवेदन..


(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )


महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून दुष्काळ जाहीर केला असून त्याचा मोठा आर्थिक फटका देवळाली प्रवरा शहर व परिसरातील नागरिकांना बसत आहे शेती व्यवसाय आणि रोजगारावर परिणाम झाल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ठराविक कालावधीसाठी तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी नगरसेवक तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते पक्षप्रमोद तुकाराम (दासू ) भीमराव पठारे यांनी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना निवेदनाद्वारे केली आहे .
सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुष्काळी परिस्थितीचा विचार करून नागरिकांवर घरपट्टी पाणीपट्टी व इतर करांच्या वसुलीचा अतिरिक्त आर्थिक भार टाकने योग्य ठरणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कर वसुलीलाकाही काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे नगर परिषदे कडून विविध दाखले साठी निल दाखल्याची शक्ती करू नये नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असणारे जन्म दाखला मृत्यू दाखला रहिवासी दाखला मालमत्तेसंबंधीत दाखले तसेच इतर आवश्यक असणारे कागदपत्रे देताना घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याचा किंवा थकबाकी नसल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी करू नये अशी मागणी ही श्री पठारे यांनी केली आहे .
केवळ घरपट्टी व पाणीपट्टी ची बाकी असल्याच्या कारणावरून नागरिकांचे आवश्यक कागदपत्रे रोखून नये दुष्काळाच्या काळात नागरिकांना शासकीय व प्रशासकीय कामासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे सहज आणि विनासह्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांना आर्थिक दिलासा देणे तसेच त्यांचे आवश्यक शासकीय व प्रशासकीय कामे कुठलाही अडथळा विना पूर्ण होणे ही नगर परिषदेची सामाजिक जबाबदारी आहे यामुळे या मागण्यावर तातडीने नगरपरिषदेने सहकारत्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे .
यावेळी नगरसेविका सुनिता थोरात नगरसेवक शरद वाळुंज काँग्रेस नेते वैभव दादा गिरमे अनिल चव्हाण भाऊसाहेब गुंजाळ दीपक पठारे रमेश गायगाये विजय कुमावत ॲड. कुमार भिंगारे किशोर पंडित मनीष देठे अमोल चव्हाण श्रीकांत नालकर विशाल गाडे कैलास कोल्हे केतन चव्हाण आदींसह देवळाली प्रवरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post