ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेची अवैधरीत्या दारू वाहतूक करण्यावर कार्यवाही*

*ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेची अवैधरीत्या दारू वाहतूक करण्यावर कार्यवाही* 

(अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान )


अकोला:ऑपरेशन प्रहार अंतर्गत दिनांक ०१/१०/२०२६ रोजी मा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी सर , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब आपल्या पोलीस स्टाफ सह अकोला शहरात अकोट फइल रेल्वे ओवर ब्रीज येथे नाकाबंदी करीत असताना एक इसम संशयतरित्या वाहन चालवताना येताना दिसला 
त्याला थांबून त्याच्या वाहन क्रमांक NH30BJ0215 वाहनाची तपासणी केली असता त्याच्या वाहनावर अवैधरित्या दारू वाहतूक करताना मिळून आला त्याला त्याचे नाव विचारले असता रितेश रामनारायण जयस्वाल राहणार मोठी उमरी अकोला असे सांगितले त्याच्या जवळून एक मोटरसायकल व देशी संत्रा टँगो चे 96 नग व विदेशी दारू मॅकडॉनल्ड्स , रॉयल स्टेग , रॉयल चॅलेंज चे 55 नग असा एकूण अंदाजे 89 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे पुढील कारवाई करिता त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई माननीय पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला , हेडकॉन्स्टेबल अनिल लापुरकर , सचिन वैरारे , पोलीस कॉन्स्टेबल योगेश चौधरी , रिषभ शर्मा यांनी केली
Previous Post Next Post