जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात राजोरे,तालुका यावल येथील एल.एम.पाटील विद्यालयातील नाट्यचमु अव्वल!*

*जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात राजोरे,तालुका यावल येथील एल.एम.पाटील विद्यालयातील नाट्यचमु अव्वल!* 

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.४ ऑक्टेबर
जी.डी.बेंडाळे महाविद्यालय जळगाव येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धा अंतर्गत यावल राजोरे येथील एल.एम.पाटील विद्यालय नाट्य चमूने 
महासागरांचे पुनरुज्जीवन पिढ्यांचे जतन' या विषयावर सादर केलेल्या नाटकासाठी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

सदर स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील तालुकास्तर प्रथम क्रमांक विजेत्या १५ संघांनी सहभाग नोंदवला होता अतिशय अटीतटीच्या स्पर्धेत एल.एम.
पाटील विद्यालयाने विजयश्री आपल्याकडे खेचून आणली.
जळगाव जिल्ह्याच्या सन्माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी
कल्पना चव्हाण मॅडम यांच्या हस्ते व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सन्माननीय रागिणी चव्हाण मॅडम,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सन्माननीय एजाज शेख साहेब तसेच सन्माननीय परीक्षक यांच्या उपस्थितीत प्रथम क्रमांक विजेत्या एल.एम.पाटील विद्यालयाच्या नाट्यचमुला तसेच मार्गदर्शक शिक्षिका मुख्याध्यापिका वैशाली इंगळे मॅडम,नाटकाच्या लेखिका सौ.जयश्री काळवीट मॅडम,( प्राथ.शिक्षिका ,शाळा सांगवी खुर्द ) मार्गदर्शक डॉ.नरेंद्र महाले सर ( विज्ञान विभाग प्रमुख यावल तालुका),तबला वादक आशिष पाटील या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विजेत्या संघाला विभाग स्तरावर नाट्य सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
या यशासाठी एल.एम.पाटील विद्यालय राजोरेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली इंगळे मॅडम,त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद व सहभागी नाट्य चमुचे विशेष अभिनंदन! तसेच विभाग स्तरीय नाट्य महोत्सवासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.
Previous Post Next Post