दुष्काळाचा इतिहास पुन्हा उंबरठ्यावर
१९७२ नंतर पुन्हा दुष्काळाचे गंभीर सावट ५४ वर्षांनी पुनरावृत्ती?काळ बदलला शेतीचे तंत्र बदलले माञ पाण्यासाठीची शेतकऱ्याची धडपड आजही कायमच.
(बीड/प्रशांत बाफना विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)
१९७२ च्या भीषण दुष्काळाच्या आठवणी आजही ज्येष्ठांच्या मनात ताज्या आहेत पाण्यासाठी वणवण करपलेली पिके आणि जगण्यासाठीचा संघर्ष त्या काळातील हे चित्र आता पुन्हा डोळ्यासमोर उभे राहत आहे तब्बल ५४ वर्षांनंतर २०२६ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर पुन्हा दुष्काळाचे गंभीर सावट घोघावताना दिसत आहे काळ बदलला शेती आधुनिक झाली सिंचनाची साधने वाढली मात्र पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पदरी येणारी चिंता माञ आजही तशीच असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका चिञातून १९७२ आणि २०२६ या दोन दुष्काळी परिस्थितीची तुलना करण्यात आली आहे एका बाजूला १९७२ मधील भीषण दुष्काळ पावसाची प्रतीक्षा करपलेली शेती आणि जगण्यासाठीची धडपड तर दुसऱ्या बाजूला २०२६ मधील पावसाची अनिश्चितता घटता पाणीसाठा आणि शेतकऱ्यांसमोरील वाढते संकट दाखवण्यात आले आहे चिञातील ही तुलना केवळ दोन वर्षांची नसून बदलत्या काळातही शेतकऱ्यांच्या मूलभूत पाण्याच्या प्रश्नाचे वास्तव अधोरेखित करणारी ठरत आहे यंदाच्या खरीप हंगामात पावसातील मोठ्या खंडाचा फटका मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील शेतीला बसला आहे

