कानिफनाथ मंदिराची दानपेटी फोडली! श्वानपथकासह बोटांच्या ठशांच्या आधारे तपास सुरू

कानिफनाथ मंदिराची दानपेटी फोडली! श्वानपथकासह बोटांच्या ठशांच्या आधारे तपास सुरू

अहिल्यानगर | प्रशांत बाफना


येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानाची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. राजा वीरभद्र देवाच्या यात्रेनिमित्त गावात भाविकांची गर्दी असतानाच ही घटना घडली.सोमवारी सकाळी देवाची विधिवत पूजा करण्यासाठी आलेल्या पुजार्‍यांच्या निदर्शनास दानपेटी फोडल्याचा प्रकार आला.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अहिल्यानगर येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने दाखवलेल्या मार्गाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिरी येथे रविवारी व सोमवारी राजा वीरभद्र देवाची यात्रा असल्याने गावात मोठी वर्दळ होती. यात्रेनिमित्त विविध गावांतील व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. रविवारी रात्री कानिफनाथ मंदिर परिसरात छबिना व शोभेच्या दारूचा कार्यक्रम झाला.

त्यामुळे रात्री बारा ते एक वाजेपर्यंत ग्रामस्थ आणि भाविक या परिसरात उपस्थित होते. त्यानंतर पहाटे एक ते चार वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली असावी, अशी शयता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून बोटांचे ठसे संकलित केले आहेत. श्वसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कंडारे यांनी दिली.मौल्यवान वस्तू, शेतमालाच्यासुरक्षिततेची काळजी घ्या ः कंडारेदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छोट्या-मोठ्या चोर्‍यांचे प्रमाण वाढण्याची शयता लक्षात घेता ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी सतर्क राहावे. घरातील रोख रक्कम, दागिने व अन्य मौल्यवान वस्तूंसह शेतातील मालाच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी केले आहे
Previous Post Next Post