सरकारने संरक्षणाची हामी घ्यावी, क्लिप देणारा समोर आणु - जरांगे पाटील
बीड/प्रशांत बाफना:
मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या 500 कोटी रुपयांच्या देवाण- घेवाण ची कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या रजाकिय पटलावर मोठी खळबळ उडाली. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे) आरोप प्रत्यारोपांचे वादळ उठले होते. त्यातच आता सरकारच्या तपासी यंत्रणांकडून जरांगे पाटील यांना ऑडिओ क्लिप कोणाकडून मिळाली अशी विचारणा करण्यात आली आहे. सरकारला याबाबत जे आवश्यक आहे ते आम्ही पुरवू मात्र, ऑडिओ क्लिप देणार्याच्या संरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी असं प्रत्युत्तर दिल्याने राज्यात पुन्हा एकदा ऑडिओ क्लिपच्या चर्चेला वाव मिळत आहे.
जरांगे पाटील यांच्या ऑडिओ बॉम्बमुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले होते. शिवसेना शिंदे गटातील मंत्री, आमदारांनी भाजपवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे निशाना साधला होता. त्यावर भाजपकडूनही शिवसेना (शिंदे) गटाला सुनावण्यात आले होते. दरम्यान एका कॉनफरन्स च्या माध्यमातून चार ते सात लोकांच्या संवादामध्ये मराठा आंदोक मनोज जरांगे पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत 500 कोटी रुपये दिल्याचां कथित संवाद आहे. या ऑडिओ क्लिपच्या तपासाची जरांगे पाटील यांनी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित ऑडिओ क्लिपची सतत्या समोर यायला हवी,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर मला देण्यासाठी पाचशे रुपये आणले नसतील तर त्यांच्यवा मुलाचे नाव यामध्ये असल्याने त्यांची बदनामी झाली आह. बदनामी पुसून काढून हे खोटं आहे असं ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ऑडिओ क्लिप तपासामध्ये तळाशी जावं. शिवाय ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवाहन करत फडणवीस साहेबांच्या परस्पर या गोष्टी झाल्या का? झाल्या असतील तर यामधील लोकं आपले असले तरी फडणवीस साहेबांनी कारवाई करून ‘ प्रसंगी आमचे लोकांनही आम्ही सोडत नाहीत ’ असा संदेश द्यावा. त्यांच्या परस्पर जर हे कारस्थान रचलं गेलं असलं तर ते त्यांच्या राजकीय करिअरसाठी मोठा धोका असल्याने त्यांनी खरा प्रकार समोर आणावा अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली होती.
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाचे अश्वान दिले त्यानुसार सरकारच्या तपासी यंत्रणेकडून जरांगे पाटील यांना ऑडिओ क्लिप प्रकरणी पत्राद्वारे विचारणा करण्यात आली आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी संवाद साधत याकामी सरकारला आपण जे लागेल ती मतद करायला तयार आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लिप देणाराच्या संरक्षणाची हामी घ्यावी असं म्हणत जरांगे पाटील यांनी चौकशी समितीच्या पत्राला एकप्रकारे उत्तर दिले

