भाजपला रामराम, काँग्रेसला सलाम! अशोक कांबळे यांच्या पक्षांतराने देगलूरमध्ये राजकीय खळबळ..
भाजपचे माजी शहराध्यक्ष काँग्रेसच्या गळाला रामदास पाटील सुमठाणकर व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश..
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :देगलूर शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पक्षाला धक्का देत भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अशोक लालू कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे देगलूर शहरातील राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या ‘देवाश्रय’ निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अशोक कांबळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अशोक कांबळे हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आणि जनसामान्यांमध्ये मिसळून काम करणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. सुरेश दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भाजपवर टीकेची तोफ; राजकीय घातपाताचा आरोप!
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक कांबळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मागील नगरपालिका निवडणुकीत आपल्यासोबत राजकीय घातपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकारणात पदापेक्षा जनतेचा विश्वास आणि लोकसेवा महत्त्वाची असल्याचे सांगत आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.काँग्रेसच्या गोटात उत्साह; कार्यकर्त्यांकडून स्वागत
अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती या पक्षप्रवेश सोहळ्यास खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर, माजी उपनगराध्यक्ष बालाजी सेठ रोयलावार, अविनाश निलमवार, देगलूर तालुकाध्यक्ष विष्णात पाटील शेखापूरकर, अमोल देशमुख शिळवणीकर, नांदेड जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे, सुनील मामा येशमवार, कंधारकर मामा, लालू कोयलावार, ईतिहास भाई दौलतावादी, संजय जोशी, अब्दूल आहाद, मंडलेवार काका, हाफिज खान पठाण, सदाशिव शिंदे पाटील, अमोल येशमवार, विकास नरबागे आणि आय्यान लाला यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

