संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता यावल नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत शेळगाव बॅरेज येथून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेस आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्याबाबत नगराध्यक्ष सौ छायाताई अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे..

 संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता यावल नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत शेळगाव बॅरेज येथून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेस आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्याबाबत नगराध्यक्ष सौ छायाताई अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे..

यावल प्रतिनिधी

यावल शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शेळगाव बॅरेज येथून पाणीपुरवठा करण्याची योजना सुरू आहे. सदर योजनेचे काम सध्या सुमारे ५० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.
सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून,त्यामुळे आगामी काळात यावल शहरात देखील पाणीटंचाई चे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. येथील शहराचा पाणी पुरवठा हतनूर धरणावर अवलंबून आहे मात्र धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता आगामी फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचे आवर्तन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी,यावल शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

या संभाव्य संकटावर कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शेळगाव बॅरेज येथून यावल शहराला पाणीपुरवठा करणारी सुरू असलेली योजना लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. सदर योजना पूर्ण झाल्यास यावल शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होईल तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येईल.

तरी आपणास नम्र विनंती आहे की, यावल शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शेळगाव बॅरेज येथून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे सकारात्मक व तातडीने शिफारस करावी.

या योजनेस आवश्यक निधी वेळेत उपलब्ध झाल्यास योजनेचे काम पूर्ण करून यावल शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता करून देणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यास मोठी मदत होईल.

आपण या जनहिताच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी सौ. छायाताई अतुल पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष
यावल नगरपरिषद यावल यांनी केली आहे .
Previous Post Next Post