शहाद्याच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात "एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत विद्याश्रम परीसरात वृक्षारोपण. .(नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने "एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत विद्याश्रम परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ एस. पी. पवार, प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल, प्राचार्य डॉ.एम.के. पटेल, प्राचार्य प्रा.बी.के. सोनी, प्राचार्य प्रा. आर.एस. पाटील आदी उपस्थित होते. "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी "झाडे लावा झाडे जगवा" हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन पर्यावरण संतुलन राहावे यासाठी वृक्षारोपण केले आहे. सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठया प्रमाणावर होत आहे हा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. म्हणूनच वृक्ष लागवड ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षारोपण करणे आजच्या काळाची गरज असून यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे. आजच्या या आधुनिक युगात पर्यावरणावर कोणाचेही लक्ष नाही वृक्ष लागवड केली तरच परिसर बहरलेला असेल त्यामुळे पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर राहील म्हणून वृक्षारोपण करण्याची गरज आहे. एक एक झाड लावलं तर ते एक एक वृक्ष तयार होईल. पर्यावरण सरंक्षणासाठी एक चांगला संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे. यावेळी विविध रोपांची वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0