जळगाव जिल्हा प्रतिनिधी ---- आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच सलग्न आदिवासी एकता मंच या संघटने मार्फत यावल प्रकल्पातील वर्ग 4 कर्मचारी च्या समस्या अडचणींचे निराकरण होणे साठी आज एकता मंच चे यावल प्रकल्प अध्यक्ष श्री.दस्तगिर तडवी व संघटनेचे पदाधिकारी यांच्या मार्फत प्रकल्प कार्यालय यावल येथे जाऊन प्रकल्प कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री.अहिरे साहेब यांना एकुण 12 मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले व वर्ग 4 कर्मचारी चे मागण्यांचे निराकरण ताबडतोब करावी अशी मागणी करण्यात आली.या मागण्यामध्ये 1.कर्मचारीना स्थायी आदेश मिळणे बाबत 2.कालबध्द पद्दौन्नती बाबत 3.निवडश्रेणी लागु करणे बाबत 4 सेवा पुस्तक अद्ययावत करणे बाबत 5.भविष्य निर्वाह निधी बाबत 6,वर्ग चार कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात बाबत , वर्ग 4 कर्मचारी 8 तास ड्युटी बाबत... अश्या विविध स्वरूपाच्या 12 मागण्यांचा उल्लेख दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे या प्रसंगी संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष श्री.दस्तगिर तडवी प्रकल्प उपाध्यक्ष विजय सुरवाडे.निलेश तडवी सचिव श्री.जब्बार तडवी.रफीक तडवी याकुब तडवी. श्री.जगदीश नाईक, श्री रामा जाधव उपस्थित होते

Previous Post Next Post