पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला, डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे ठप्प. (अंकुश मानकर तालुका प्रतिनिधी डहाणू ) डहाणू : पालघर रेल्वे स्थानकावर झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवर दिसून येतोय. पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत. गाड्या बंद असल्यामुळे डहाणू रेल्वे प्लॅटफॉर्मवर कामावर जाणाऱ्यां लोकांची गर्दी वाढू लागलीय. पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ दिनांक 28/05/2024 रोजी साडे पाचच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारी मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रॅक नंबर दोन तीन आणि चार हे नादुरुस्त झाले. त्यामुळे अप आणि डाऊनची दोन्हीही रेल्वे सेवा प्रभावित झाले आहे.आजही उपनगरीय सेवा बंद असून अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू असून अजूनही पाच ते सहा तास काम पूर्ण व्हायला लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही डब्बे घसरले आहेत तर काही डब्बे पुर्णपणे पलटी झाले आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा ठप्प आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, दोन क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0