शासन आदेशामुळे वृद्ध महिला व पुरुषांची तहसील कार्यालयावर गर्दी. मनोज गवई (जिल्हा प्रतिनिधी अमरावती) चांदुर रेल्वे : श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा जे लाभार्थी मागील कित्येक वर्षापासून 65 वर्षाच्या अधिक वय असलेल्या लाभार्थ्यांना महिला व पुरुष यांना श्रावण बाळ व संजय गांधी निराधार या योजनेतून1500₹ प्रति महिना लाभ घेत आहेत. ज्यामुळे त्या वृद्ध महिला व पुरुषांना जीवन जगण्यासाठी आधार मिळत आहे. ही योजना चालू झाली तेव्हा या लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता केली होती तेव्हाच या महिला व पुरुषांना हा लाभ मिळत आहे. परंतु आता शासनाकडून दिनांक26/3/2024 पत्रानुसार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट ही पेन्शन स्वरूप रक्कम जमा करण्यासाठी लाभार्थ्यांना वयाचा पुरावा मोबाईल क्रमांक बँकखात्याला लिंक करणे आणि आधार कार्डची झेरॉक्स या सर्व कागदांची पूर्तता गावातील पटवारी कार्यालयामध्ये दिनांक31/05/2024 पर्यंत जमा करण्यात सांगितले आहे. या कागदपत्राची पूर्तता करण्याकरिता वृद्ध महिला व पुरुष एवढ्या खूप उष्णतेच्या 42/43 डिग्री तापमानामध्ये तहसील कार्यालयाच्या भोवती फिरत आहेत. यामध्ये जन्म तारखेचा दाखला पुराव्या करिता शाळेतील टीसी, किंवा कोतवाल बुकाची नक्कल याकरिता तहसील कार्यालयामध्ये वृद्ध महिला व पुरुष भटकत आहेत. स्थानिक तहसील कार्यालय मध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 3618/ श्रावण बाळ योजनेअंतर्गत 12,393/ वृद्ध बाळ योजनेअंतर्गत 2406 आणि विधवा व अपंग योजनेअंतर्गत 86 चांदुर रेल्वे तहसील मध्ये लाभार्थी आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0