लोहारा ते कुसुंबा रस्त्याचे डांबरीकरण करता करता ,ठेकेदार झाला गायब..फक्त खडीकरण करून रस्त्याचे तीन तेरा नऊ अठरा.. डांबरीकरणाची प्रतीक्षा.तात्काळ डांबरी करण करण्याची परिसरातील जनेतेसह वाहनधारकांची. शेतकऱ्यांची मागणी. कुसुंबा ता रावेर (जिल्हा प्रतिनिधी रशीद तडवी)तालुक्यातील लोहारा हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले असून हा कुसुंबा ते लोहारा हा मार्ग केळी बागायती क्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे.म्हणून या कुसुंबा ते लोहारा रस्त्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते .त्याच बरोबर पाल ते इंदोर हा रोड हायवे बनल्याने चारचाकी वाहनासह मोठमोठे शमतेपेक्षा जास्त भरतीचे ट्रक देखील या रस्त्याने नेहमी ये जा करीत असतात त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण होणे जिक्रीचे झाले आहे त्यामुळे ह्या लोहा रा ते कुसुंबा रस्त्याचे ताबडतोब डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांकडून करण्यात आली आहे..तात्काळ रस्ता डांबरी करण करावा अशी रास्त स्वरूपाची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

Previous Post Next Post