आम्हाला खड्ड्यात गाडल्यावरच तिड्या अंधारमळी. मोहमांडी रस्त्याचे डांबरी करण करणार का? आदिवासी जनतेची बांधकाम खात्याकडे रस्ता डांबरीकरणाची मागणी. जळगाव जिल्हा प्रतिनिधी (जूम्मा तडवी) तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तिड्या, अंधारमळी, मोहमांडी रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून हे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत.या रस्त्याने प्रवास करीत असता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.कारण हा रस्ता भर जंगलातून गेलेला आहे.या रस्त्याने प्रवास करीत असता.जंगली प्राणी हिंस प्राण्यांपासून देखील जीव वाचवावा लागतो.त्यातच रस्त्याची दयनीय अवस्था पाहून जणू डोळ्यात अश्रू यायला वेळ लागत नाही.इतकी बिकट परिस्थिती या रस्त्याची झाली आहे.तरी संपूर्ण बांधकाम खात्याची अधिकारी सर्वसामान्य आदिवासी जनतेचे हाल करण्याचे काम करीत आहेत. भाड मे जाये जनता ओर अपना काम बनता अशी परिस्थिती या रस्याबाबत बांधकाम खात्याच्या अधिकारी .आमदार खासदार सबंधित अधिकारी यांची स्थिती झाली आहे.वारंवार विविध वृतपत्र आणि न्यूज चेनल.डिजिटल मीडिया चे माध्यमातून बातम्या प्रकाशित करून देखील यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही असेही परिसरातील जणतेकडून बोलले जात आहे.यांचे करावे काय प्रश्न आदिवासी जनतेला खूप त्रास देत आहे.इकडे आड तिकडे विहीर अस्या रस्त्याचा प्रवास करणेही नाईलाईजने जिक्रिचे झाले आहे.गरोदर महिलांना देखील या रस्त्याने नेत असता अनेक जीवघेण्या सारख्या घटना घडल्या आहेत..तरी सबंधित अधिकारी पदाधिकारी यांनी गांभीर्याने या रस्ता कडे लक्ष देऊन तात्काळ डांबरीकरण करावे आणि आदिवासी जनतेचे होणारे हाल थांबवावे..जर पावसाळा सुरू होण्याआधी रस्ता डांबरीकरण नाही झाला, तर.. रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा . तिड्या.अंधारमळी,मोहमंडी. निमड्या.गारखेडा चे आदिवासी जनतेकडून सबंधित अधिकारी.पदाधिकारी यांना देण्यात येईल.पाहूया याकडे कोणी लक्ष देते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0