जळगाव जिल्हा प्रतिनिधि{रशीद तडवी} तालुक्यातील कुसुंबा गावासह अनेक गावांमध्ये रावेर पोलिसांच्या आशीर्वादाने गावठी दारूसह अवैध धंदे बोकाळले आहेत याबाबत संवित्तर वृत्त असे की दारूचा नखरा आणि बायको मारी चकरा अशी परिस्थिति सध्या तरी पाहावयास मिळत आहे. कुसुंबा गांव ही सातपुडा पर्वताशी वसलेले गाव म्हणून परिचित आहे ह्या गावात छोट्या छोट्या कारणावरून भांतणतंटे नेहमी सुरूच असतात त्यातच बेवळे देखील गावठी चा नशा करून विनाकारण सर्वसामान्य नागरिक . महिला यांना त्रास देतांना नजरेस पडत आहे हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू असून आजपर्यंत कोणताच पोलिस अधिकारी हे दारूचे अड्डे व अवैध धंदे बंद करायला आले नाही किंवा त्या दारू वालेनचे काही हेकोडे केले नाही ,पैसा फेक तमाशा देख असे चित्र सध्या कुसुंबा गावात दिसत असल्याने ह्या दारुड्या बेवळ्यांमुळे कुसुंबा गावचा नाकाशाच बिघडला आहे ,यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतांना दिसत आहे . याकडे मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोणीही आवाज उठवायला तयार नाही . जो आवाज उठवतो त्याच आवाज बंद केला जातो यामध्ये देखील राजकारण खेळले जाते , गावातील पोलिस पाटील देखील नावपूर्ते आहेत नाव मोठे दर्शन खोटे यांना देखील बडतर्फ करून गावात पोलिस चौकी स्थापन करण्याची अत्यंत गरज आहे गावातील .पोलिस पाटील हे गावाटले भांडण न मोडून भांडण भडकवून रावेर पोलिस स्टेशन ला बोलावून बीट हवलदार ,ठाणे अमलदार. पोलिस पाटील . पोलिस निरीक्षक हे सर्व मिळून सर्वसामान्यांना पोलिस स्टेशन ला बोलावून पैसा लुबडण्याचा धंदा सध्या जोर धरत आहे ह्या प्रकारात पोलिस पाटलांची खूप मोठी मदत असतेअसेही कुसुंबा गावातील महिला व सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे . तरी या संपूर्ण प्रकारची जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन . कुसुंबा गावसह तालुक्यात गावठी दारू कायमची बंद करावी . व यामध्ये ज्यांचेही अनमोल सहकार्य होत आहे. त्यांचेवर कडक दंडात्मक कारवाई करावी . अशी रास्त स्वरूपाची मागणी तालुक्यातील जनतेकडून . महिलांकडून करण्यात आली आहे.