शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी. (सुरतान पावरातालुका प्रतिनिधी )अक्राणीखरीप हंगामाच्या सुरवातीला बाजारात अनेक प्रकारचे नकली बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होतात यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी बियाणे खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांनी दक्षता घेत बियाणे खरेदी करावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची दक्षता बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. खरेदी केलेल्या मालाची पक्की पावती घेऊन त्यावरील पीक वाण लाट नंबर कंपनीचे नाव इत्यादी तपासावे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0