बिलोली आठवडी बाजारातील अवैध वसुली थांबवण्यासाठी आंदोलनाचा इशारा. राहुल दुगावकर(,जिल्हा प्रतिनिधी, बिलोली) बिलोली शहरात दोन दिवस आठवडी बाजार भरत असतो मुख्यत्वे रविवार व गुरुवार व मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो एकेकाळी चारशे वर्षे जुना तालुका म्हणून गणल्या गेलेल्या तालुक्याचे वैभव आता नाहीसे होत चालले आहे खरेदी करायची म्हंटली की सगरोळी परिसरातील नागरिक बोधन ला पसंत करतात कासराळी परिसरातील नागरिक नरसी नायगाव पसंत करतात, कुंडलवाडी परिसरातील नागरिक धर्माबाद पसंत करतात या ऊपर लहानसहान दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू गावातच मिळतात बिलोली शहराच्या आसपासच्या परिसरातील लोक आठवडी बाजारासाठी बिलोली येथे येतात मात्र येणाऱ्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन वसुली केली जात असल्याने अवैधरित्या पावती न देता नगरपालिकेचा कर चुकवत वसुली करनाऱ्या इसमावर उच्च स्तरीय चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात नगर परिषद बिलोली येथे रितसर निवेदन देण्यात आले आहे शहरातील आठवडी बाजारामध्ये खाजगी इसमा कडून विना पावतीचे शेतकऱ्या कडून व व्यापाऱ्या कडून व प्रति क्यारेट पाच रुपये वसुली करत असल्याचे प्रकार निदर्शनास येताच तो खाजगी इसम कोण? व त्याला हा अधिकार कोणी दिला ? त्याची उच्चस्तरीय चौकशी करुन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजकुमार गादगे,हेमंत पटाईत,राहुल मामडे, साईराज रुद्रुरकर, उमेश बारुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post Next Post