परळी शहरातील भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमा नगर येथील मुलीच्या लग्नासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करणार. बालासाहेब जगतकर. परळी प्रतिनिधी---परळी शहरातील भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमा नगर येथील मुलीच्या लग्नासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या वर्षीपासून परळी शहरातील भीम नगर साठे नगर रमा नगर व प्रबुद्ध नगर येथील ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असून ज्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी व्हावे लागते ते न होऊ देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळी भीम नगर च्या वतीने गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केला असून गेल्यावर्षी सात मुलीच्या लग्नासाठी तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळी भीम नगर च्या वतीने पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली असून याही पुढे तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र भीम नगर परळी च्या वतीने पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली असून जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा असेही आव्हान करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Previous Post Next Post