*सरदार पटेल विद्यामंदिरात विठूमाऊलींचा गजर... (*रावेर/प्रतिनिधी - दि.16 विनायक जहुरे) रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर,ऐनपूर शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुख्ममाईचा देखावा सादर करण्यात आला. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, संचालक पी.एम.पाटील व सहसचिव आर.एस.पाटील यांच्याहस्ते विठ्ठल रुखमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले. चिमूकल्या विद्यार्थ्यांची परिसरातून दिंडी काढण्यात आली.दिंडी मार्गेवर महिलांनी विठ्ठल-रुखमाईच्या वेशभूषाधारण केलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन केले.विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे,टाळ,मृदुंग,वीणा व तुळशी वृंदावन होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच किरण चौधरी,निकिता चौधरी,कल्याणी शिंदे,जयश्री सराफ,अश्विनी चौधरी,अनिता महाजन,कविता बोदडे,वैष्णवी महाजन,श्रद्धा बारी,जागृती पाटील,काजल धनके,चंदा महाजन,अक्षदा सपकाळ,आयुष चौधरी,योगिता शिवरामे,जाईबाई मावळे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post