*गुरुपौर्णिमा निमित्त खिर्डी परिसरात होणार देवपूजा वंदन* महानुभावांची तब्बल ८०० वर्षांची आगळीवेगळी परंपरा कायम.. रावेर-प्रतिनिधी- दि.18 विनायक जहुरे आषाढ महिना लागताच संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांच्या भक्तीला उधाण येते. सर्वत्र भक्तीमय वातावरणाची निर्मिती होते. यानिमित्ताने तब्बल आठशे वर्षांपासून महानुभाव पंथीय देवपूजा वंदनाच्या सोहळ्याची वेगळी परंपरा जपून मोक्षमार्गाची वाटचाल सुकर करीत आहेत.आषाढ, श्रावण हा सण उत्सवांचा महिना. आषाढी वारीच्या या पार्श्वभूमीवर सद्या पंढरपूरच्या दिशेने अनेक वारकरी पताका खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करीत चाललेले दिसून येते. इकडेमहानुभाव मंडळी परमेश्वराच्या श्रीचरण स्पशनि पुनित असलेले श्रीमूर्ती वस्त्र, प्रसाद, विलोभनीय अशी परमपवित्र देवपूजा पाषाण तब्बल ८०० वर्षांपासून सांभाळलेली आहे. महाराष्ट्रात सुमारे ३ टक्के संख्येने असलेले महानुभाव अनुयायी हे वंदन करण्यासाठी आषाढी एकादशी ते पौर्णिमेंपर्यंत खिर्डी परिसरात गावोगावी मठ, मंदिर, आश्रमांना भेटी देतात. मुंबईपासून गोंदिया, लातूरपासून नंदुरबार, चंद्रपूरपासून सातारा व अवघ्या महाराष्ट्रात सर्वदूर अनेक मठ, मंदिर मार्गात देवपूजा उपलब्ध होणार आहे. हजारो वर्षापासून संत, महंत, त्यागी, तपस्वी व साधकांनी परमेश्वर अवताराच्या स्पर्श संबंधीत व सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी, श्रीगोविंदप्रभू यांनी भक्तांना प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तू अत्यंत सुरक्षित राहाव्यात, या उद्देशाने सांभाळून ठेवल्या आहेत. खिर्डीत वंदन करण्यास मिळणार 800 वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची मूर्ती :-श्रीकृष्ण मंदिरात संस्थान खिर्डी खुर्द येथे महानूभाव पँथतील चौथे अवतार यांचा आरशा विशेष, गुजरात राज्यातील संगम रवरी पाषाण असणारी श्री चक्रधराची मोठी मूर्ती,वज्री घडवणे, पिवळं तळोली असे प्रसाद वंदन सर्व भक्त मंडळीला करण्यास उपबद्ध असेल.संपूर्ण तालुक्यात असते नियोजन:- आषाढी एकादशीच्या तिसऱ्या दिवशी महेलखेडी, कोरपावली, यावल डोंगरकठोरा येथे सकाळी या विधीला प्रारंभ झाला . अनेक भक्तांचा समूह सांगवी, फैजपूर, सावदा, तांदलवाडी, खिर्डी, निंभोरा, वाघोदा, केऱ्हाला, भोकरी, सावखेडा, कोचूर यां गावेगाव जाऊन देवपूजा वंदन करतात जी देवपूजा पेटीमधे बंद असते याची काळजी महानुभाव मंडळी ८०० वर्षांपासून घेत आहेत. पवित्र देवपूजा उत्सवप्रसंगी सिंहासनावर या पवित्र वस्तू रचून त्यावर रेशमी वस्त्रे अंथरून त्याची योग्य पध्दतीने मांडणी करतात व येणाऱ्या भाविकांना वंदन करण्यासाठी उपलब्ध करून देतात. भारत देशातील विविध राज्यातून आलेली मंडळी याचा लाभ घेतात. नागपूर जिल्ह्यातही या कालावधीत परमपवित्र देवपूजा वंदनाचा सोहळा सर्व मठ, मंदिर व आश्रमात होत.
byMEDIA POLICE TIME
-
0