काकरपाटी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ते दुरुस्ती करणे या संदर्भात ग्रामसेवक यांना निवेदन.. (उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी धडगांव)धडगांव : काकरपाटी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाल्याने पूर्णपणे खराब झालेले असुन तेथील लोकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे तरी या प्रश्नांकडे ग्रामसेवक व गावातील सरपंच व उपसरपंच यांनी योग्य ती चौकशी करून तात्काळ गाव अंतर्गत रस्ते हे दुरुस्ती करण्यात यावे, असे निवेदन ग्रामसेवक यांना देण्यात आले असून या वेळी निवेदन देतांना उपस्थित ग्रामस्थ दिनेश वळवी,उदेसिंग पराडके, दिलीप रुपा वळवी संजय वसावे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0