बंद पडलेला अप्पर तहसील कार्यालय पूर्ववत चालू करण्याची मागणी. ( अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी) ढाणकी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा म्हणून 1995 पासून गावातील व परिसरातील गावखेड्याची मागणी होती त्यासाठी गावातील नागरिकांनी आंदोलन पण केले होते.त्यावर शासनाने दुधाची तहान ताकावर भागवत नायब तहसील कार्यालय चालू केले होते. उमरखेड तालुक्यात 125 महसुली गावाचा समावेश असून तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाच्या वर आहे.वाढती शहरी करण यामुळे वाढलेल्या प्रशासकीय कामाचा निपटारा जलद गतीने करण्याकरीता तसेच नागरिकांच्या सोयीसुविधे करीता अप्पर तहसील कार्यालय ढाणकी येथे चालू करण्याची मागणी केल्या जात आहे.अप्पर तहसील कार्यालय पूर्ववत करण्यात यावे म्हणून ढाणकी व परिसरातील गाव खेड्याच्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून आहे परंतु प्रशासन अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीला प्रतिसाद देत नाही. ढाणकी नगरीत सण 1997 मध्ये नायब तहसील कार्यलय उभारून कामकाज केल्या जात होते त्यामुळे उमरखेड तहसीलवरचा आर्धा भार कमी झाला होता परंतु ढाणकी नायब तहसील कार्यालयाला तालुक्यातील काही नेत्याची नजर लागली अन त्यामुळे सण 2000 मध्ये ढाणकी नगरीतील नायब तहसील कार्यालय अचानक बंद करण्यात आले.ढाणकी शहराशी 40 गाव खेड्याचे आर्थीक व्यवहार जोडल्या गेले आहेत त्यामुळे गावखेड्यातील नागरीक यांना शासकीय कामासाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे ढाणकी येथे अप्पर तहसील कार्यलय चालू केल्यास बंदी भागातील नागरिकांचा आर्थिक शारिरीक मानसिक त्रास वाचेल व वेळेत कामे होऊन तहसील कार्यालयात चकरा मारण्या पासून सुटका मिळेल. ढाणकी नगरी ची लोकसंख्या 40 हजाराच्या वर असल्यामुळे तालुका नसते वेळी सुद्धा नगरपंचायत करता येते मग 24 वर्षा पूर्वी चालू करून बंद केलेलं नायब तहसील कार्यालय पूर्ववत करण्यास कोणती अडचण प्रशासनाला जात आहे?आसा प्रश्न नागरीकाला पडला आहे. चौकट प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयाचे विभाजन करून नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापित केले मग ढाणकी येथील अप्पर तहसील कार्यालयाची मागणी तशी जुनी आहे आणी नागरिकांच्या हिताची असूनही प्रशासन ढाणकी व परिसरातील गाव खेड्यातील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत असेल तर आम्ही आमच्या वरीष्ठ पदाधिकारी यांच्याकडे मागणी करू वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू रोहित वर्मा जिल्हा महामंत्री भाजपा

Previous Post Next Post