31जुलै रोजी प्रा.वाल्मीक बन सेवानिवृत्त होणार.... (आष्टी प्रतिनिधी) एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय,आष्टी जि.बीड येथील इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे प्रा.वाल्मीक बापूराव बन आपल्या 32 वर्ष,नऊ महिन्याच्या सेवेनंतर दि.31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.कासारी ता.आष्टी, जि.बीड येथे प्रा.वाल्मीक बन यांचा दिनांक 20 जुलै 1966 रोजी जन्म झाला.अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. लातूर येथील पुरणमल लाहोटी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पूर्ण केले.हंबर्डे महाविद्यालयात दि.16 ऑक्टोबर 1991 रोजी पूर्णवेळ इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्राध्यापक म्हणून रुजू झाले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथे वर्ष 2014 ते 2018 पर्यंत त्यांनी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले.इयत्ता बारावी बोर्डात त्यांनी 21 वर्ष मॉडरेटर अर्थात नियामक म्हणून काम केले.त्यांचा मुलगा आणि सून दोघेही पुणे येथील नामांकित कंपनीत इंजिनियर आहेत.कोविड सारख्या अतिभयंकर काळात त्यांनी खडकत,सुरुडी,वाकी, बीडसांगवी येथे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या पथकात चेक पोस्टवर निष्ठेने काम केले.वरिष्ठाकडून त्यांच्या चेक पोस्टवरील कामाची प्रशंसा करण्यात आली.दिनांक 31 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हंबर्डे महाविद्यालयात प्रा.वाल्मीक बन यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0