जि प प्रा शा हादगाव खुर्द येथे ग्रेड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू :आज दि. २०/७/२०२४ शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हादगाव खुर्द येथे ग्रेड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले गेले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संजीव कुमार इंगळे,रामराव बोबडे व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रामराव बोबडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मौजम शेख यांनी करून दिला. स्वागत गीत रामप्रसाद पावडे याने गायले. सकाळ सत्रात आनंदी शनिवार उपक्रम राबवला गेला व दुपार सत्रात कला शिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी ग्रेड परीक्षेविषयी उपस्थित 200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वस्तू चित्र, स्मरण चित्र ,संकल्प चित्र आणि भूमिती व अक्षर लेखन आदी ग्रेड परीक्षेचे विषय उदाहरणासह समजावून सांगितले. द्वितीय सत्रात बौद्धिक खेळ व कृतीयुक्त गाणे घेतली गेली. यावेळी बालकांनी कृतीशील सहभाग नोंदविला. तसेच वारली चित्रकला व विविध टाळ्यांचे प्रकार कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी शिकविले. यावेळी बालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुमारी मोहिनी उगले हिने कार्यशाळे विषयी मनोगत व्यक्त केले.तर आभार मारुती पावडे याने मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी सहशिक्षक नारायण शिंदे, बाबासाहेब बाबर , नितीन खाकरे, प्रमोद रोडगे, मोजम शेख व श्रीमती शारदा खेडकर, सारिका दवणे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post