बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा सिद्धनाथ बोरगाव येथे ग्रामीण जनजागृती आणि लसीकरण उपक्रम. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).सेलू : दि. १८ जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंर्तगत बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू यानी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यक्रमा अंर्तगत सातव्या सत्रातील विद्यार्थीनी सिद्धनाथ बोरगाव येथे जनावरांना होत असंणा-या लंपी आजारांवर मात करण्यासाठी सिद्धनाथ बोरगाव येथे शेतकऱ्यां ना भेट देऊन लंपी आजारांवर जनावरांना लसीकरण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा वेळेस गावातील शेतकरी आणि डॉ. अप्पासाहेब लहाने उपस्थित होते. या प्रात्यक्षिकामध्ये कृषी कन्यानी लंपी आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला. कृषी कन्या अंजली फुंडे, विष्णु प्रिया मडके, साक्षि कदम,आचल निकाळजे,पि.साई. यांनी कार्यक्रम आयोजित केले .या प्रात्यक्षिका साठी कृषी महाविद्या लय सेलू येथील प्राचार्य डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एन. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी व्ही. एम. साखरे आणि विषय शिक्षक एस. बी.गजमल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0