आम आदमी पार्टी चे "मय्यत प्रेत आंदोलन"लोणारा गाव वासियांचा गटविकास अधिकारी यांचा समोर संताप. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि चंद्रपुर भद्रावती ) भद्रावती दि.23:- आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा - भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात व युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात भद्रावती तालुक्यातील लोणारा (पारखी) गावातल्या नागरिकांना घेऊन "मय्यत प्रेत आंदोलन" करण्यात आले. गेल्या 50 वर्षा पासून लोणारा या गावात स्मशान भूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना चंद्रपूर - नागपूर हायवे रस्त्याच्या कडेला प्रेत जाळावे लागतात. गावकऱ्यांची समस्या घेऊन सात महिन्या अगोदर आम आदमी पार्टी ने पंचायत समिती भद्रावती ला निवेदन दिले. परंतु इतके दिवस उलटून ही गावकऱ्यांच्या समस्या चे निवारण करण्यात आले नाही. हाच संताप व्यक्त करण्यासाठी व झोपलेल्या पंचायत समिती ला जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी ने समस्त गावकऱ्यांना घेऊन पंचायत समिती भद्रावती विरोधात "मय्यत प्रेत आंदोलन" पुकारले व चक्क मय्यत घेऊन आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व समस्त गावकरी "पंचायत समिती मुर्दाबाद" चे नारे देत पंचायत समिती समोर दाखल झाले. गटविकास अधिकारी साहेब आंदोलनाला भेट देण्या करिता समोर येताच आंदोलनाचे नेतृत्व करणारे आप चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. गटविकास अधिकारी साहेब यांनी आंदोलनाची दखल घेत आश्वासन दिले की येत्या 10 दिवसात जागेचा पाठपुरावा करून स्मशान भूमी करिता जागा उपलब्ध करून येत्या काही दिवसात स्मशान भूमी च काम पूर्ण करून देऊ. लवकरात लवकर गावकऱ्यांना स्मशान भूमी तयार करून द्या अन्यथा गावकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी पंचायत समिती ची असेल असा इशारा आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा - भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांनी व्यक्त केला. यावेळी आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, जिल्हा संघटन मंत्री भीमराज जी सोनी, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष दीपक बारशेट्टीवार, महानगर महिला अध्यक्ष एड. तब्बसूम शेख, आसिफ हुसेन शेख, रोहन गाज्जेवार, अनुप तेलतुंबडे, मीडिया प्रभारी प्रशांत रामटेके, सॅम्युअल गंधम, दिलीप कापकर, राजकुमार चट्टे, सुरज खंगार, अमित कसारे, सतिष कुथे, वैभव तंकाडे, शुभम गंडलेवार, सुनील खोंडे, अविनाश निखाडे, विजय आत्राम, मनोज पारखी, लक्ष्मण देवतळे, स्वप्निल पारखी, दिनेश गोचे, विजय राजूरकर, केतन पारखी, शंकर गोचे, कार्तिक नागपुरे, गोकुळ गोचे, सुरज वासेकर, मनीष पारखी, स्वप्निल ढुमणे, रवींद्र सोयाम, श्रीकांत पायपरे, सचिन डाहुले, आकाश आत्राम, प्रतीक पायपरे, निखिल गोचे, विवेक पिंपळे, प्रवीण राजूरकर, आविश पारखी, समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post