नंदुरबार, शहादा येथे लोक न्यायालयात दोन हजार केसेस निकाली; सुमारे नऊ कोटी रुपयांची तडजोड.... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे झालेल्या लोक अदालतीत सुमारे दोन हजार 30 केसेस निकाली काढण्यात आले. यातून 8 कोटी 72 लाख 32 हजार 506 रुपयांची तडजोड करण्यात आली. यात नंदुरबार येथील जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालती दरम्यान दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये एक हजार 665 प्रकरणांचा निपटारा होऊन यातून 6 कोटी 28 लाख 24 हजार 589 तडजोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्या. वरिष्ठ स्तर एम.बी.पाटील यांनी दिली आहे. तर शहादा येथील लोक न्यायालयात 365 प्रकरणांचा निपटारा होवून 2 कोटी 44 लाख 7 हजार 917 रुपये इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. काल दि. 27 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघत प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, कौटूंबिक वाद प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व सर्व बँका, श्रीराम फायनान्स आदी थकबाकी प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली होण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये नंदुरबार न्यायालयात प्रलंबित दोन हजार 807 प्रकरणे व दाखलपूर्वक 15 हजार 124 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. सदर लोक न्यायालयाप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आशुतोष कळमळकर, जिल्हा न्यायाधिश-1 आर. जी. मलशेट्टी, जिल्हा न्यायाधिश-२ एम. आर. नातू, दिवाणी न्यायाधिश सतिष मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी अजित यादव, सचिव महेंद्र पाटील, दुसरे सहदिवाणी न्यायाधिश आर.एन. गायकवाड, ए. आर. कुळकर्णी तसेच पॅनल विधीज्ञ उपस्थित होते. लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार येथील प्रभारी प्रबंधक डी.पी. सैंदाणे, नंदुरबार वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रेमानंद इंद्रजित, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधिक्षक जे.वाय. सानप, तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधीज्ञ यांचे सहकार्य लाभले. सदर लोक न्यायालयात नंदुरबार जिल्ह्यातील प्रलंबित व दाखलपूर्व दोन्ही मिळून एकूण 1 हजार 665 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. सदर प्रकरणांमधून 6 कोटी 28 लाख 24 हजार 589 रुपयांची तडजोड करण्यात आली. शहादा येथील लोक आदालत मध्ये न्यायालयीन 1075 तसेच दाखल पूर्व त्यात बँका व ग्रामपंचायतीमधील घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीदारांचे 4580 असे एकूण 5655 केसेस ठेवण्यात आले होते. त्यापैकी न्यायालयीन -137 खटले तर दाखल पूर्व 228 खटले असे एकूण 365 खटले निकाली निघाले यात 2 कोटी 44 लाख 7 हजार 917 रुपये वसूल करण्यात आले. यासाठी चार पॅनलची नेमणूक करण्यात आली होती. यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एम गुप्ता यांचे सोबत ॲड. एम एस साळवे, दिवाणी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश यु एन पाटील यांचे सोबत ॲड.बी पी शिंदे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही.व्ही निवघेकर यांचे सोबत ॲड.सी डी भंडारी, न्यायमूर्ती श्रीमती एस आर पाटील यांच्या सोबत ॲड.आर एम सोनवणे असे एकूण चार पॅनल नेमण्यात आले होते. यावेळी वकिल संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अधीक्षक विनायक पाडवी, सहाय्यक अधीक्षक एस व्ही जंवंजलकर, वरिष्ठ लिपिक विलास सी सूर्यवंशी, किशोर ठाकुर, स्टेनो एम टी घुगे, यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post