रावेर ता. ताायक्वांदो असोसिएशन च्या आठ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !कॅडेट चंद्रपूर व ज्युनिअर बीड येथे होणार राज्यस्तरीय स्पर्धा ! (रावेर ता प्रतिनिधी) रावेर ता, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅडेट ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे उत्साहात पार पडल्या . रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या बारा खेळाडूंनी सहभाग नोंदवित आठ सुवर्ण सुवर्ण पदकांची कमाई केली ,तसेच 4 रौप्य पदक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले.यात कॅडेट मध्ये 1.अथर्व सोनार,सुवर्ण 2.अमर शिवलकर,सुवर्ण 3.ज्ञानेश्वरी दिक्षित,सुवर्ण 4.हर्षदा गायकवाड,सुवर्ण 5.संगकारा तायडे,रौप्य 6.भूषण गाढे,रौप्यआणि ज्युनिअर मध्ये1.लोकेश महाजन,सुवर्ण 2.सिध्दांत घेटे,सुवर्ण 3.प्रबुद्ध तायडे,सुवर्ण 4.साई नीळे ,सुवर्ण 5.मुकेश भोई,रौप्य 6.प्राचाल कोळी,रौप्य या खेळाडूंनी विजय प्राप्त केले दरम्यान सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची १९ रोजी चंद्रपूर येथे कॅडेट व २६ रोजी बीड येथे ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना प्रशिक्षक जीवन महाजन,जयेश कासार यांचे मार्गदर्शन लाभले व सहप्रशिक्षक स्नेहल अट्रावलकर,नमिता सुरवाडे, पंच. जिल्हा सचिव अजित घारगे सर,जयेश बाविस्कर,निलेश पाटील,यश शिंदे,बळवंत सर सहकार्य,दिनेश चौधरी,हेमंत गायकवाड यांचे सहकार्य लाभलेसर्व खेळाडूंचे रावेर तायक्वांडो असो. अध्यक्ष, डॉ.संदीप पाटील उपध्यक्ष दिपक नगरे, वाय पी माळी , डॉ. सुरेश महाजन, आयुष अग्रवाल, राजेश पाटील, श्रीकांत महाजन सर, जे.के पाटील सर, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे अध्यक्ष रवींद्र पवार सर, शिरीष मैराळे, विष्णू चारण, मंगेश महाजन, अमर रणसिंगे,स्वामी स्पोर्ट , क्लब, सरदार जी जी स्पोर्ट क्लब, लोहपुरुष स्पोर्ट क्लब, शिव स्पोर्ट क्लब यांनी पुढील राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

Previous Post Next Post